प्रतिनिधी / विटा
शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील सातबारा उतारे ऑनलाइन अपडेट करणे राहिले आहेत. उतारे अपडेट करताना 16 आणेची अट लावली जात आहे. मात्र हस्तलिखित उताऱ्याना अशी अट नाही. यामुळे शहरातील व्यवहार खोळंबत आहेत. त्यामुळे 16 आणेची अट न लावता ऑनलाइन उतारे मिळावेत, अशी मागणी शहर शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना देण्यात आले. शहरप्रमुख राजू जाधव, समीर कदम, बाजार समितीचे माजी उपसभापती राजेश कदम, सागर गायकवाड, सोमनाथ फडतरे उपस्थित होते.