प्रतिनिधी / पलुस
विठ्ठलवाडी ता. पलूस येथील रेल्वे गेट जवळ एका अज्ञात इसमाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला आहे. याबाबत पलूस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विठ्ठलवाडी- किर्लोस्करवाडीच्या दरम्यान रेल्वेगेट जवळील पोट कॅनॉलजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीने दारूच्या नशेत आपले बुट काढून रेल्वे रूळावर झोपून आत्महत्या केली असावी असा अंदाज पलूस पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
रेल्वेच्या धडकेमुळे सदर व्यक्तीच्या जागीच मृत्यू झाला आहे. परिसरात चौकशी करूनही सदर व्यक्तीची ओळख पटली नसून सदर घटनेच्या अधिक तपास पलूस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार गिरीश मोरे करत आहेत. सदर व्यक्तीची ओळख पटल्यास 9067293265 या नंबर संपर्क साधा. असे आवाहन पलूस पोलिसांकडून करण्यात आले आहे.