सेन्सेक्स 180 अंकांनी मजबूत : निफ्टी 10,311.20 वर बंद
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजारात वित्तीय कंपन्यांच्या जोरावर तेजी राहीली होती. यामध्ये सेन्सेक्स जवळपास 180 अंकानी तेजी राखत बंद झाला आहे. साधारणपणे भारत-चीन यांच्यातील सीमेवरील संघर्ष आणि जगासोबत देशातील वाढती कोविड19 ची संख्या यांच्या प्रभावामुळे शेअर बाजारात काहीसे दबावाचे वातावरण असल्याचे मागील आठवडय़ापासून पहावयास मिळत आहे. परंतु उद्योग क्षेत्राला दिलेल्या शिथिलतेमुळे गुंतवणूकदारांचा कल सकारात्मक असल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे आणि याचेच परिणाम सोमवारी बाजारात राहिले आहेत.
दिवसभरातील बाजारातील व्यवहाराच्या दरम्यान सेन्सेक्स 482 अंकांनी भक्कम स्थितीत राहिला होता. परंतु प्रमुख समभागांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 179.59 अंकांनी वधारुन निर्देशांक 34,911.32 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 66.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,311.20 वर बंद झाला. प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत बजाज ऑटोचे समभाग सर्वाधिक 7 टक्क्मयांनी फायद्यात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, पॉवरग्रिड आणि ऍक्सिस बँकेचे समभाग तेजीत राहिले आहेत.
दुसऱया बाजूला मात्र बाजारात ओएनजीसी, एचडीएफसी, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. अभ्यासकांच्या माहितीनुसार आशियाई बाजारातील वातावरण काही प्रमाणात मिळते जुळते राहिले होते. यामुळे देशातील शेअरबाजारात तेजी पहावयास मिळाली आहे. प्रमुख क्षेत्रांमध्ये बँक, वित्तीय संस्था, धातू याच्यातील लिलावाचाही फायदा झाला आहे.
भारत चीन यांच्यातील तणाव आणि वाढती कोविड रुग्णांची संख्या याचा परिणाम आगामी काळात देशातील शेअर बाजारावर राहणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे तर अन्य बाजारात चीन, दक्षिण कोरिया, जपान हे चढउतारात राहिल्याचे दिसून आले आहे.