ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने फैलावत चालला आहे. या कोरोनाच्या विळख्यात विविध राजकीय पक्षांचे आमदार देखील सापडत आहेत. विधाननसभा अधिवेशनापूर्वी तब्बल 23 आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि अकाली दलाच्या आमदारांची संख्या जास्त आहे अशी माहिती समोर आली आहे.
28 ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये एक दिवसीय विधानसभा अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 117 आमदारांच्या कोरोना चाचण्यांपैकी 23 आमदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यातील काही आमदार होम क्वारंटाइन आहेत. तर काही आमदारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.