वृत्तसंस्था/ टोकियो
भारताचा थाळीफेक पॅराऍथलीट विनोद कुमारने कांस्यपदक मिळविले असले तरी त्याच्या दिव्यांगत्वाच्या वर्गीकरणावर आक्षेप घेतल्याने त्याचे पदक रोखण्यात आले होते. विनोदचे एफ 52 मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या कॅटेगरीतील खेळाडूत स्नायुदुर्बलता, हालचालीवर मर्यादा, अपंगत्व किंवा पायांच्या लांबीत फरक असणाऱया खेळाडूंचा समावेश असतो. त्यानुसार 22 ऑगस्ट रोजी आयोजकांनी त्याचे वर्गीकरण केले होते. मात्र विनोद कुमारच्या वर्गीकरणाला कोणत्या आधारावर आव्हान देण्यात आले, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्याचे पुनरावलोकन करण्यात येत असल्याने पदक वितरण लांबणीवर टाकण्यात आले असून त्याचे वितरण सोमवारी 30 रोजी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.