नवी दिल्ली –
देशातील दिग्गज आयटी कंपनी विप्रोच्या मुख्य माहिती अधिकारीपदी (सीआयओ) अनुप पुरोहित यांची नियुक्त करण्यात आली आहे. विप्रोने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार अनुप यांच्याकडे बँकिंग आणि आर्थिक सेवांमधील जवळपास 25 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. जो डिजिटल बँकिंग, आर्थिक व्यवस्थापन, व्यापार आणि सेवा वितरण, पोर्टफोलियो आणि अन्य जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कंपनीने स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे मुख्य माहिती अधिकाऱयांच्या स्वरुपात आपली जबाबदारी सांभाळणार असल्याचा विश्वास मुख्य अधिकारी संजीव सिंह यांनी स्पष्ट केला आहे.