‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा
बेळगाव : ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत सांबरा येथील विमानतळावर तब्बल 40 फूट रुंद रांगोळी काढण्यात आली. देशातील विविधतेमध्ये एकता कशा पद्धतीने आहे, हे या रांगोळीतून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही भव्य रांगोळी पाहून प्रवाशांमधूनही कौतुक केले जात आहे. व्हिजन फ्लाय अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ही सुंदर अशी रांगोळी रेखाटली, 12.5 फूट रुंद तर 40 फूट लांब अशी ही रांगोळी आहे. विमानतळावर दाखल होणारे प्रवासी ही रांगोळी आवर्जुन पहात आहेत. विमानतळावरील अधिकारी वर्गाने या रांगोळीला नुकतीच भेट दिली.