ऑनलाईन टीम / मुंबई :
काही दिवसांपूर्वी भारताच्या माजी क्रिकेटपटू श्रावंती नायडू यांच्या आईला करोनाची बाधा झाली होती. त्याची प्रकृती गंभीर होती. आतापर्यंत 16 लाख रुपये तिला खर्च आला होता आणि त्यानंतर श्रावंती नायडू यांनी मदतीची विनंती केली होती.
त्यांच्या मदतीसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली पुढे आला असून त्याने काही लाख रुपयांची मदत केली आहे. विराटने श्रावंतीच्या आईसाठी 6 लाख 77 हजार रुपयांची मदत केली आहे. कोहलीने याबाबतची एक पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली आहे आणि या पोस्टला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे.
नायडूच्या मदतीसाठी भारतासाठी महिला बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गट्टा पुढे सरसारवली होती. ज्वालाने यावेळी एक ट्विट केले होते. भारताची माजी क्रिकेटपटू श्रावंती नायडूचे आई आणि वडिल हे सध्या कोरोनाशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची ही झुंज सुरु आहे. श्रावंतीने तिच्या उपचारांसाठी आतापर्यंत 16 लाख रुपये खर्च केले आहेत. पण आता तिला पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, विराट आणि अनुष्काने कोरोना रुग्णांना मदत म्हणून 11 कोटी रुपये जमा केले. यात विराट-अनुष्काने स्वत: 2 कोटी रुपयांची मदत केली. या पैशांमधून ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांची मदत केली जाणार आहे.