कोल्हापूर/ प्रतिनिधी
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ते केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात पत्रकार, कोल्हापूर जिल्ह्यातील बुध्दिजीवी व विचारशील व्यक्तींसमवेत संवाद साधणार आहेत.
सन 2020-2021 या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सिमारामन यांनी नुकतास संसदेत सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जिल्हावार पत्रकार परिषदांचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला असून कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
प्रविण दरेकर यांचे रेल्वेने गुरुवार, दिनांक 11 फेब्रुवारी, 2019 रोजी कोल्हापूर येथे आगमन होईल, सकाळी 10.00 वाजता ते अंबाबाई देवीचे दर्शन घेतील, सकाळी 10.40 वाजता बिंदू चौकातील भाजपा कार्यालयाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, दुपारी 12.00 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृहात केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील व सायंकाळी 05.00 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृहात बुद्धिजीवी व विचारशील व्यक्तींसमवेत संवाद साधणार आहेत.