प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे संपूर्ण देशच संकटात आहे. त्यामुळे देशाला आपण काही तरी मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे, असे समजून पायोनियर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जोशी व त्यांची पत्नी नेहा जोशी यांनी आपल्या मुलीच्या विवाहातील खर्चाची 51 हजाराची रक्कम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे दिली आहे.
आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये अत्यंत साधेपणाने त्यांनी मुलगी रसिका हिचा विवाह केला. इतर कोणताही खर्च न करता हा विवाह साधेपणाने केला. कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यानंतरच आम्ही पुन्हा स्वागतसमारंभ भरवू असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या आपल्या कुटुंबातील व्यक्तीं व्यतीरिक्त कोणालाही याविवाह समारंभाला त्यांनी बोलविले नसल्याचे सांगितले. तीच रक्कम आता समाजहितासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले.