अनेक संस्थांनी कष्टकरी महिलांच्या श्रमाची घेतली नोंद : सत्कार, मागण्यांसाठी मोर्चे, निवेदने, आरोग्य शिबिरे, व्याख्यानांसह विविध उपक्रम
बेळगाव : विविध संघटना आणि संस्थांतर्फे महिलांचा सत्कार, महिलांच्या मागण्यांसाठी मोर्चे आणि निवेदने, आरोग्य शिबिर, व्याख्याने अशा विविध उपक्रमांनी शहरामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. याच दिनाचे औचित्य साधून लोकमान्यतर्फे महिला सन्मान 2022 ठेव योजना सुरू करण्यात आली. अनेक संस्थांनी प्रामुख्याने कष्टकरी महिलांच्या श्रमाची नोंद यानिमित्ताने घेतली.
राष्ट्रीय महिला फेडरेशन
स्त्राrला दुर्गा आणि कालिका असा दर्जा दिला जातो. मात्र स्त्राrवर होणारे अत्याचार अजूनही थांबत नाहीत. हे महिलावर्गाचे दुर्दैव आहे. नुकतेच बागेवाडी येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या स्त्राrवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. तेंव्हा तातडीने एफआयआर दाखल करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी महिलांनी निवेदनात केली आहे. याचबरोबर महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी तेलंगणा राज्यामध्ये दिशा विधेयक लागू केले आहे. तशाचप्रकारे कर्नाटकातही कायदा लागू करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महिला फेडरेशनतर्फे देण्यात आले.
महिलांवरील अत्याचारांबरोबरच महिलांना घर सांभाळतानादेखील अनेक अडचणी येत आहेत. सिलिंडर, तेल, कडधान्य, भाजीपाला यांचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडत आहे. तेंव्हा सरकारने योग्यप्रकारे या सर्वांचा दर समतोल ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.
महिलांना काम मिळत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. सध्या कर्नाटकात बहुसंख्य महिला नरेगावरच अवलंबून आहेत. त्यामुळे नरेगा अंतर्गत त्यांना काम मिळणे गरजेचे आहे. याचबरोबर 22 हजार दिव्यांग आहेत. त्यांनादेखील रोजगार मिळणे महत्त्वाचे आहे. प्रसूती काळात महिलांना ज्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्या सरकारने द्याव्यात. जेणे करून महिला सुरक्षित होतील, असेही या निवेदनात म्हटले आहे. महिलांच्या आरक्षणाबाबतही सरकारने निर्णय घेणे गरजेचे आहे. शहरात उन्हामध्येच महिला भाजी विक्री करतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केट तयार करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
महिला दिने महिलांवर होणाऱया अन्यायांसह महिलांना येणाऱया अडचणींबाबत या निवेदनात समस्या मांडल्या आहेत. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फेडरेशनच्या राज्य सचिव प्रमोदा हजारे, पार्वती नाईक, अक्कम्मा सिद्धगवळी, हेलन खराडे, अलका कुमार पाटील, शुभांगी पाटील, शैलजा भडगावी, लक्ष्मी पाटील आदी उपस्थित होत्या.
मराठा मंडळ फार्मसी कॉलेज
मराठा मंडळ फार्मसी कॉलेजतर्फे महिला दिनानिमित्त मेहंदी व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चिक्कबळ्ळापूर होत्या. प्रारंभी देविका जोरापुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अर्चना पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. दीपप्रज्वलनानंतर प्रा. अश्विनी यांनी महिला दिनाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन वैभवी गुरव यांनी केले. यावेळी प्रा. एन. सुमा यांनी आभार मानले.
बेळगाव जिल्हा महिला परिषद
महिला दिनानिमित्त महिलांनीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या समस्या मांडल्या आहेत. जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवा, शहरातील गटारीसह इतर समस्या तातडीने सोडवा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिलांवर होणाऱया अत्याचाराबाबतही माहिती देऊन आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी बेळगाव जिल्हा महिला परिषदच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजीपाला, पेट्रोल, सिलिंडर, कडधान्य, खाद्यतेल यांचे दर वाढतच चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. आमचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तेंव्हा या सर्वांचे दर स्थिर ठेवा, असे या निवेदनात म्हटले आहे. गॅसचा दर 1 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांना हे परवडणारे नाही. तेंव्हा तातडीने सिलिंडरचे वाढलेले दर तातडीने कमी करा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
पाणीपुरवठा करताना वेळेत करावा. त्यासाठी वेळ निश्चित करावी, जेणेकरून महिलावर्गाला त्रास होणार नाही. कचरादेखील वेळेत उचलावा. वृद्ध महिलांना देण्यात येणारी पेन्शन हीदेखील वेळेत द्यावी, जेणेकरून त्यांना त्याचा योग्य विनियोग होईल. यासह इतर मागण्या करण्यात आल्या. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्षा माधुरी नेवगेरी, अनुराधा सुतार, सुनिता सुभेदार, पूजा काकतकर, शुभांगी निकम, प्रिया घोरपडे, माधुरी जाधव, माधुरी सावंत, अनिता गावडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
अपोलो फार्मसी
अपोलो फार्मसीतर्फे महिलादिनानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मधुमेह आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली. याप्रसंगी अपोलो फार्मसीचे संचालक, कर्मचारी व नगरसेविका वर्षा आजरेकर उपस्थित होत्या.
भारतीय सेना
भारतीय सेनेतर्फे महिला दिनानिमित्त काश्मीरच्या किस्तवाड येथील महिलांचा सत्कार करण्यात आला. सेनेतर्फे आत्मनिर्भर योजनेंतर्गत 24 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना 8 मार्च रोजी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 30 महिलांनी याचा लाभ घेतला.
मुख्य म्हणजे या महिलांना ज्यांनी प्रशिक्षण दिले ते उग्रवादी कारवायांमध्ये सक्रिय होते. 2007 मध्ये त्यांनी आत्मसमर्पण केले आणि आपली पत्नी नगीमा बेगम यांच्या सहकार्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनीच या महिलांना प्रशिक्षण दिले. या महिलांनी पूर्णपणे स्वावलंबी व्हावे यासाठी सेना आता जिल्हा प्रशासनातर्फे चर्चा करणार आहे.
भारतीय माहेश्वरी महिला संघटना
अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेतर्फे महिला दिनानिमित्त ‘स्वश्रीता’ हे महिला सुरक्षा सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले. यावेळी समितीच्या संयोजिका राजकुमारी चांडक, राष्ट्रीय कार्यकारिणी समिती सदस्या कमला तोष्निवाळ, कर्नाटक गोवा प्रांतच्या सचिव सरिता सारडा उपस्थित होत्या. तसेच माहेश्वरी महिला मंडळ शहापूरच्या पदाधिकारी सुरेखा चिंडक, रुक्मिणी मालू यांच्या उपस्थितीत गीता गणाचारी या महिलेला शिलाई मशिन देण्यात आली. या संघटनेद्वारे संपूर्ण भारतात 525 तर कर्नाटकात 10 शिलाई मशिन देण्यात आल्या.
सुवर्णलक्ष्मी सोसायटी
सुवर्णलक्ष्मी सोसायटीतर्फे महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेत काम करणाऱया राजश्री जाधव, उज्ज्वला हंगिरगेकर, तारा सालीकर या महिलांचा सत्कार करण्यात आला तर साक्षी मुतकेकर, गुणंजय शिरोडकर, प्राजक्ता देशपांडे, आदित्य बाळेकुंद्री, अनुज किल्लेकर, सुकृती कारेकर, प्रीती धुडूम, प्रिया पेडणेकर, कीर्ती बांदिवडेकर या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून भातकांडे शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नुकर उपस्थित होत्या. त्यांनी वर्षभर महिलांचा सन्मान जपला जावा, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विठ्ठल शिरोडकर यांनी नाना शेठ यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. उपाध्यक्ष विजय सांबरेकर यांनी महिला दिन कसा सुरू झाला, याची माहिती सांगितली. संस्थापक मोहन कारेकर यांनी सर्वांना
शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जायंट्स ग्रुपच्या खजिनदार नम्रता महागावकर यांचा सत्कार करण्यात आला. तृप्ती शहापूरकर यांनी आभार मानले.
महिला आघाडी
महिला दिनानिमित्त महिला आघाडी व एसजीबी आयुर्वेदिक मेडिकल हॉस्पिटल्सच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, डॉ. मंजुळा, सीमा देसूरकर, सरिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 150 हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले. सरिता पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी अर्चना वागळे, अर्चना देसाई, आशा सुपली, कांचन येळ्ळूरकर यांच्यासह अन्य सदस्या उपस्थित होत्या.
नियती फौंडेशन
नियती फौंडेशनच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले. लेखिका व शिक्षिका आशा रतनजी, पॅराबॅडमिंटनपटू आरती पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्या सुवर्णा पिटगी, खानापूरच्या अबनाळी येथील आशा कार्यकर्त्या संजना गावकर, सामाजिक कार्यकर्त्या गौरी गजबर, मोनिका दाते, उद्योजिका लीना टोपण्णावर व रुपा देसाई, आहारतज्ञ डॉ. हरप्रित कौर व सनातन संस्थेच्या विजया दीक्षित यांना पुरस्कार देण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार मंगला अंगडी व डीसीपी पी. व्ही. स्नेहा, समन्वयक वाणिश्री पाटील व सांस्कृतिक केंद्र नागपूरचे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर उपस्थित होते. प्रारंभी फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर व भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.
महिला हिंदू खाटीक समाज
महिला हिंदू खाटीक समाजातर्फे महिला दिनानिमित्त मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी इचलकरंजी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्या भोपळे व हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकारिणी सदस्या उज्ज्वला गावडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी विद्या घोडके यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षा इंदिरा जानवेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी छाया प्रभावळकर, सरिता काळगेकर, जया जानवेकर, शालन बेळगावकर, वैशाली घोडके व महिला उपस्थित होत्या. सर्व महिलांना पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. श्रुती घोडके यांनी आभार मानले.
आराधना विशेष मुलांची शाळा
सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. शाळेतील शिक्षिका व महिला कर्मचाऱयांची प्रशंसा करण्यात आली. विद्यार्थिनींच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रशीदभाई व मारुती कुंभार यांनी केले.
खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटना
खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारतनगर येथील नेताजी सांस्कृतिक भवन येथे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर सरिता पाटील, नगरसेवक रवी साळुंके, स्वच्छता निरीक्षक शिल्पा कुंभार, संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, पी. जे. घाडी, सुहास शहापूरकर, विनायक घोडेकर यांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पहाटेपासून कार्यरत असणाऱया महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांचे कौतुक करत आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे माजी महापौर सरिता पाटील यांनी सांगितले. नगरसेवक रवी साळुंके यांनी स्वच्छता कर्मचाऱयांना येणाऱया अडचणींबाबत महानगरपालिकेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खानापूर तालुका म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, विजय घोडेकर, सुरेश कळ्ळेकर, परशराम कोळेकर, नामदेव कोळेकर, भरत नांदवडेकर, प्रतीक गुरव, संजय पाटील, रोहित भाकोजी, किरण हुद्दार, रुपा नावगेकर यासह इतर उपस्थित होते.