नवी दिल्ली
: चिनी स्मार्टफोन कंपनी विवोचा नवा स्मार्टफोन वाय 20 लवकरच भारतात लाँच करण्याची तयारी चालली असल्याचे समजते. क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 460 चिपसेटसह हा फोन येणार असून अँड्रॉइड 10 ओएसवर तो चालेल. इतर वैशिष्टय़ांबाबत मात्र कंपनीने गुप्तता पाळली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ग्राहकांमध्ये या फोनमध्ये आणखी काय वैशिष्टय़े असणार आहेत याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.