राजकुमार दोरगुडे उत्कृष्ट पोझर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मराठा युवक संघ बेळगाव व बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 56 व्या बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धेत लाईफटाईम फिटनेस व्यायामशाळेच्या विशाल चक्हाण याने बेळगाव श्री हा मानाचा किताब पटकाविला तर आयुर जिमच्या राजकुमार दोरगुडेने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला.
मराठा मंदिर येथील सभागृहात आयोजित बेळगाव श्री शरीरसौष्टव स्पर्धेत जिल्हय़ातील एकूण 155 स्पर्धकांनी भाग घेतला होता. आयबीबीएफच्या नियमानुसार ही स्पर्धा सात वजनी गटात घेण्यात आली. सतत 56 वर्षे ही स्पर्धा भरविण्याचा मान मराठा युवक संघाला मिळाला आहे. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे -55 किलो गट-1) आकाश निगराणी पॉलीहैड्रॉन, 2) ऋतिक लाखे निपाणी, 3) अल्ताफ किल्लेदार गोल्ड जिम, 4) मंथन धामणेकर रॉ फिटनेस, 5) राजकुमार दोरगुडे आयुर. 60 किलो गट-1) उमेश गंगणे एसएसएस फौंडेशन, 2) वेंकटेश ताशिलदार एसएसएस फौंडेशन, 3) आदित्य काटकर एसएसएस फौंडेशन, 4) आकाश साळुंके रॉयल फिटनेस, 5) उमेश करडे यूएस जिम. 65 किलो गट-1) आकाश रावळ एसएसएस फौंडेशन, 2) शिवकुमार पाटील एसएसएस फौंडेशन, 3) शिवभीम पाटील आयुर फिटनेस, 4) सुजीत हुद्दार राघवेंद्र, 5) दर्शन गौडा फिटनेस फोर्ज. 70 किलो गट-1) महेश गवळी एसएसएस फौंडेशन, 2) सुनील पाटील हक्मर्युलस, 3) सुनील भातकांडे एक्स्ट्रीम जिम, 4) ओमकार गोडसे पॉलीहैड्रॉन, 5) मरबाज वतनगी कार्पोरेशन. 75 किलो गट-1) प्रताप कालकुंद्रीकर एसएसएस फौंडेशन, 2) अफरोज ताशिलदार एसएसएस फौंडेशन, 3) राजू गाडीवड्डर बॉडिपॉवर, 4) सरनाईक मुंगराज एसएसएस फौंडेशन, 5) गुरू रतन समर्थ. 80 किलो गट-विशाल चव्हाण लाईफटाईम, 2) गजानन कारटेकर एसएसएस फौंडेशन, 3) मैफुज मुल्ला खानापूर, 4) रोहित भट मोरया. 80 वरील गट-1) सोमनाथ गौडा अविघ्न फिटनेस, 2) प्रताप बाळेकुंद्री एसएसएस फौंडेशन, 3) आकाश नेसरीकर फिटनेस फोर्ज, 4) सौरभ खन्नूकर मोरया, 5) महादेव वाळके आयुर यांनी आपल्या गटात पहिले पाच क्रमांक पटकाविले.
त्यानंतर बेळगाव श्री या मानाच्या किताबासाठी आकाश निगरानी, उमेश गंगणे, आकाश रावळ, महेश गवळी, प्रताप कालकुंद्रीकर, विशाल चव्हाण, सोमनाथ गौडा यांच्यात लढत झाली. त्यामध्ये प्रताप कालकुंद्रीकर व विशाल चव्हाण यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये बाजी मारत लाईफटाईम जिमच्या विशाल चव्हाणने बेळगाव श्री हा मानाचा किताब पटकाविला.
उत्कृष्ट पोझरसाठी उमेश गंगणे, वेंकटेश ताशिलदार, आकाश हरिकांत, ऋतिक लाखे, समर्थ गौडा, रोहित भट्ट, राजकुमार दोरगुडे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये राजकुमार दोरगुडेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.
प्रमुख पाहुणे संजय सुंठकर, मारूती देवगेकर, बाळासाहेब काकतकर, दिगंबर पवार, नेताजी जाधव, नारायण किटवाडकर, रघुनाथ बांडगी, चंद्रकांत गुंडकल, अविनाश पाटील, एशियन पंच अजित सिद्दण्णावर, जे. निळकंठ, उमामहेश, एम. के. गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पोझर राजकुमार दोरगुडे, तर बेळगाव श्री विशाल चव्हाण यांना मानाचा किताब, एस. के. सिद्दण्णावर यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेला फिरता चषक, कायमस्वरूपी चषक, प्रमाणपत्र, रोख रक्कम व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, एम. के. गुरव, जे. निळकंठ बेंगळूर, उमामहेश म्हैसूर, मिलिंद सालीगम, गंगाधर एम., बसवराज अरळीमट्टी, सुनील पवार, सुनील आपटेकर, नूर मुल्ला, वासुदेव साखळकर, अनंत लंगरकांडे, हेमंत हावळ तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत व राजू अष्टेकर यांनी काम पाहिले. यावेळी प्रकाश कालकुंद्रीकर, किरण पाटील, शिवाजी हंगीरगेकर, संजय मोरे, शेखर हंडे, विजय बोंगाळे, सुनील भोसले, प्रभाकर कडोलकर, सुहास किल्लेकर, पांडुरंग जाधव, विश्वास पवार आदी मराठा युवक संघाचे सभासद उपस्थित होते.