प्रतिनिधी / सातारा
वाई येथील विश्वकोश कॉलनीतून दीड लाख रुपयांच्या दागिने चोरीला गेल्याची फिर्याद अल्पना प्रकाश यादव यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली असून त्यांनी त्यांच्याकडे कामास येणाऱ्या नंदिनी मोरे(वय 32,रा.सिद्धनाथवाडी)हिच्यावर संशय व्यक्त केला आहे. दि.29सप्टेंबर 2020 ते दि.4ऑक्टोबर 2020 या दरम्यान कपाटातून 1 लाख 54 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले असून महिला पोलीस हवालदार मोकाशी या तपास करत आहेत.