संत साहित्यातील अभ्यासक, संशोधकांचा सहभाग
कोल्हापूर / प्रतिनिधी
विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे येत्या 14 ते 16 जानेवारी दरम्यान कोल्हापूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. महासैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या या संमेलनात संत साहित्याचे अभ्यासक, संशोधकांसह मान्यवरांचा सहभाग असणार आहे. ही माहिती संमेलनाध्यक्ष हरिभक्त परायण मदन महाराज गोसावी आणि मुंबई विद्यापीठातील लोककला विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी दिली.
या संमेलनात आळंदीचे हरिभक्त परायण मारूती महाराज कुऱहेकर यांना निष्ठावंत वारकरी जीवनगौरव' पुरस्काराने तर हरिव्दार येथील महंत ऋषीश्वरानंद यांना
विश्वात्मक जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनात संत साहित्यावर अभ्यास, संशोधन करणारे अभ्यासक, संशोधक सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. संत साहित्य आणि पर्यावरण, अस्वस्थ वर्तमानात संतविचारांची भूमिका आदी विषयावर परिसंवाद होणार आहे. भक्तीनिष्ठा की व्यवसाय या विषयावर महाचर्चा, निमंत्रितांचे कवीसंमेलन होणार आहे, असेही मदन महाराज गोसावी आणि प्रा. प्रकाश खांडगे यांनी दिली.