बेळगाव /प्रतिनिधी
सराफ गल्ली, शहापूर येथील शेतकरी नारायण बुधाप्पा लाड यांनी परसात बांधलेली म्हैस ट्रक्टरच्या हॉर्नच्या आवाजाला बिथरून सैरभैर झाली. खुल्या जागेतील विहिरीत ती पडली. नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर पेनच्या सहाय्याने तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. जनावरांच्या डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. यावेळी सराफ गल्लीतील मराठा पंच कमिटीचे सर्व सभासद, माजी नगरसेवक राजू व सराफ गल्ली पंच कमिटीचे अध्यक्ष यांच्यासह गल्लीतील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.