ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या वुहान लॅबमधून एक हजारहून अधिक प्राण्यांच्या जनुकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जनुकीय अभियांत्रिकीच्या मदतीने उंदीर, वटवाघूळ, ससे आणि माकडांच्या जनुकात बदल करण्यात आला आहे. जनुकात बदल करण्यासाठी या प्राण्यांना इंजेक्शन देण्यात आली होती. या इंजेक्शनमधील सामग्रीमुळे कोरोनाची उत्पत्ती झाली असावी, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या आधारे एका ब्रिटिश वर्तमानपत्राने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
जागतिक जैवतंत्रज्ञान गुंतवणुकीचा वेग वाढल्यापासून चिनी संशोधक प्राण्यांवर वेगवेगळे प्रयोग करत आहेत. अशा प्रकारच्या प्रयोगांना इतर देशांमध्ये निर्बंध आहेत. मात्र, चीनमध्ये हे उघड सुरु आहे. या प्रयोगांद्वारे व्यावसायिक नफा वाढवण्याचा चीनचा प्रयत्न आहे.