प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव वृत्तपत्र विपेता संघाच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कलाम यांनी आपल्या जीवनाची सुरुवात ही वृत्तपत्रे विक्री करून केली होती. वृत्तपत्र विक्री ते राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा दैदीप्यमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रारंभी संघटनेच्यावतीने दिवंगत अरुण मांगले, यल्लाप्पा नंदी, रामचंद्र बिर्जे, राजू जाधव, आनंद कुंदे, शशी मुंगरवाडी, उदय पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सुभाष गोरे, आनंद गर्डे, राजू भोसले, प्रताप भोसले, प्रकाश कुलकर्णी, रवि जठार, मधुकर देशपांडे, प्रवीण जोशी, गोपी दुपाटणे, पिराजी गावडे, प्रफुल्ल कुडले, सतीश गुंडूचे, संजय कदम, संजय घोरपडे, अशोक होळकर, सतीश नाईक यासह इतर उपस्थित होते.