राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रम
वेंगुर्ले / वार्ताहर
राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती सेल व सोशल मिडीया सेलच्यावतीने वेंगुर्लेत कातकरी समाजातील कुटुंबांना नेहमीच्या वापरातील गृहपयोगी वस्तुंचे वितरणाचा कार्यक्रम कॅम्प येथील कातकरी समाजाच्या वस्तीत संपन्न झाला. यावेळी कातकरी समाजाच्या 20 कुटुंबांना गृहपयोगी वस्तुंचे वितरण करण्यांत आले.
तळागाळातील जनतेत राष्ट्रवादीची प्रतिमा उंचावण्यासाठी जिल्हा युवती राष्ट्रवादी सेल व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम याबविण्यांत येत आहे. त्या अनषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेश महिला राष्ट्रवादी सचिव सौ. नम्रता कुबल व युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तु वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यात वेंगुर्ले तालुका प्रभारी तथा शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, जिल्हा सदस्य तथा माजी जिल्हा बँक संचालक नितीन कुबल, जिल्हा सरचिटणीस मकरंद परब, युवती सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष सिध्दी कांबळे, निकिता कांबळे, वेंगुर्ले शहर महिला अध्यक्ष सौ. सुप्रिया परब, माजी नगराध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्नील रावळ, सचिन शेटये यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.