परप्रांतीय, कातकरी समाजातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत : ‘युवाशक्ती’चा सलग 15 व्या वर्षी सामाजिक उपक्रम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील गरजूंना मदत
भरत सातोस्कर / वेंगुर्ले:
येथील युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून गेली 15 वर्षे व विलास गावडे मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली 20 वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी सामाजिक बांधिलकीचे काम करणाऱया विलास गावडे यांनी यापूर्वी स्वत:च्या माध्यमातून जनतेसाठी विविध मोफत सेवासुविधा दिल्या. ज्या-ज्यावेळी सर्वसामान्य व गोरगरिबांवर संकट आले, तेव्हा तेव्हा कुठलीही अपेक्षा जनतेकडून न ठेवता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मदतकार्य, मोफत आरोग्य तपासणी करून संबंधितांना संकटमुक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय, लमाणी, भटक्या जाती-जमातीतील मजूर रोजगारानिमित्त येऊन अडकून पडलेले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद ठेवल्याने आर्थिक सोर्स बंद झाल्याने अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशा अवस्थेत सिंधुदुर्ग जिह्यात युवा शक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या युवकांच्यामार्फत 10 ते 15 दिवस सर्व प्रकारचे अन्नधान्य पुरेल असे अन्नधान्य, वस्तू तसेच मेडिकल कीटचे वेंगुर्ले व सावंतवाडी भागातील सुमारे एक हजार कुटुंबांना वाटप करून युवाशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विलास गावडे यांनी माणुसकी जपली आहे.
जीवनावश्यक वस्तूंबरोबर आर्थिक मदतही
संचारबंदीमुळे अडकलेल्या चराठा तसेच वेंगुर्ले कॅम्प, निशान तलाव येथील परप्रांतीय मजुर, लमाणी मजुर, कातकरी समाज, गरीब कुटुंबांचा युवाशक्ती प्रतिष्ठानमार्फत सर्व्हे करून तसेच जेथे जेथे अन्नधान्य देण्याची गरज आहे, अशा व्यक्तींबाबतचा तहसीलदार कार्यालय वा तलाठी यांच्या सर्वेक्षणांत आढळलेल्या कुटुंबांची यादी तहसीलदार व तलाठी यांच्याकडून घेण्यात आली. त्यांना युवाशक्ती प्रतिष्ठानमार्फत तांदूळ, तूरडाळ, चवळी, वाटाणे, चाणाडाळ, कांदे, बटाटे, साखर, चहापावडर, दूध, बिस्कीट स्वरुपात लागणारे रेशन तसेच अत्यावश्यकतेसाठी लागणारे 500 ते दोन हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदतही त्यांनी केली. वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते, युवाशक्ती प्रति÷ान सिंधुदुर्गचे संस्थापक व अध्यक्ष, जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्याध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक विलास गावडे यांच्यावतीने हे मदतकार्य सुरू आहे. या मदतीबाबत कोणताही राजकीय उद्देश न ठेवता पूर्वीप्रमाणेच गोरगरीबांना मदत करीत आहेत.
यावेळी वेंगुर्ले नगर पालिकेचे गटनेते तथा नगरसेवक प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, दादा सोकटे, नगरसेविका सौ. स्नेहल खोबरेकर, सौ. कृतिका कुबल, अब्दुल शेख, सामाजिक कार्यकर्ते तौकिर शेख, चराठा तलाठी कदम आदी उपस्थित होते. संजय परब, मनोज घाडी, सुभाष माणगावकर, संतोष परब, प्रसाद वेंगुर्लेकर, महेश वेंगुर्लेकर, संजय वेंगुर्लेकर, प्रा. वीरेंद्र देसाई, वेंगुर्ले सहकारी सोसायटी चेअरमन अनंत घाडी, अंकुश मलबारी, संजय केरकर, कांता मुणनकर, जुबेर जंगुभाई, सुमित डगरे, शैलेश करंजेकर, श्री. नलावडे, प्रदीप वेंगुर्लेकर, महेंद्र गावडे, प्रशांत गावडे, आनंद परब, सुरी कुडाळकर, बंटी माणगावकर, अजिंक्मय भोसले, तुषार भोसले, नंदकिशोर गवस, विशाल पोतदार, विपूल भोसले, दत्ताराम डिचोलकर, भालचंद्र केळजी, नीलेश वराडकर, रुपेश गोलतकर, राहुल सावंत, माविया गोलंदाज, रीजवान शेख, जयंत डिचोलकर, सिद्धिक गोलंदाज, स्वप्नील साळगावकर, जाफर गोलंदाज, उदय परब, कल्याण सावंत, साईश वेंगुर्लेकर, आकांशा गायकवाड, श्रीमती लावण्या सिलम, गणेश मोरजकर, मिलींद रणभिसे, मारुती कदम, धनंजय सावंत, बाबू वेंगुर्लेकर, समाधान बांदवलकर, साहीश परब, ओंकार गावडे साईराज परब, संदीप वेंगुर्लेकर, समीर वेंगुर्लेकर, श्रीकांत रानडे, गणेश अंधारी, प्रसाद जोशी, आसिफ खान, बाबुल खान, शशांक मडकईकर, पराग मोरजकर, अश्विन पांगम, निलेश भोसले, महेश घाडी, प्रमोद घाडी, सखाराम परब, बाळकृष्ण गाडी, सुधीर गावडे, दादा गावडे, गणेश परब, भालचंद्र परब, रघुवीर परब, नंदकीशोर शिरोडकर, पंकज मुनणकर, रोहित वेंगुर्लेकर, जावेद शेख, इम्रान शेख, निकाल शेख, छोटो बावीस्कर, भालचंद्र केळजी, नीलेश वराडकर, रुपेश गोलतकर, सतेज मयेकर आदी युवा कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी अन्नधान्याचे व वस्तूंचे वितरण केले.
प्रत्येक भागात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
युवा शक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांनी गोरगरीब व परप्रांतिय मजुर वा कामगारांसाठी जे धान्याचे वितरण केले ते शासनाचा नियम पाळूनच कार्यकर्त्यांमार्फत वितरण केले.
विलास गावडेंच्या सामाजिक बांधिलकीचे प्रशासनाकडूही कौतुक
वेंगुर्ले तालुक्मयातील स्थानिक नागरिकांबरोबरच अन्य तालुक्मयात असणाऱया परजिल्हय़ातील कामगार, मजुरांना तसेच गरजू गरीब लोकांना, कातकरी समाज बांधवांना युवा शक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष विलास गावडे यांनी सुरू ठेवलेल्या, सामाजिक बांधिलकीतून करीत असलेल्या या कार्याचे प्रशासनासह सर्वत्र कौतुक होत आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-कोरोनामुळे लाँकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने मोलमजुरी करून पोट भरणाऱयांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. वेंगुर्ले शहरातील निशाण तलाव परिसरातील रोजंदारीवर काम करणारे परप्रांतिय मजुर आणि कामगार यांनाही याचा फटका बसला आहे. अशा कामगार व मजुरांसाठी वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते, युवाशक्ती प्रति÷ान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्याध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक विलास गावडे यांच्या सौजन्याने मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, माजी नगरसेवक मनिष परब, या बरोबरच युवाशक्ती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अब्दुल शेख, स्वप्नील गावडे, प्रकाश परब, सौरभ पालयेकर, शुभम गावडे, अल्ताफ शेख, स्वप्नील परब, सखाराम परब आदी उपस्थित होते.