मालवण :
वेंगुर्लेसमोरील समुद्रात सोमवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून १५ ते २० एलईडी ट्रॉलर्स बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीसाठी कार्यरत झाले होते. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जवळपास २५ वावाच्या आतमध्ये त्यांची मासेमारी सुरू होती. संबंधित एलईडी ट्रॉलर्सना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे केली. दरम्यान सोमवारी दुपारी देवगड तालुक्यातील कुणकेश्वरसमोर काही पर्ससीन ट्रॉलर्स किनाऱ्यालगत मासेमारी करीत असल्याची तक्रार तेथील मच्छीमारांनी केली होती. त्यामुळे गस्ती नौका दुपारी त्याठिकाणी रवाना झाली होती. रात्री ९ वाजेपर्यंत ती मालवण बंदरात पोहचेल असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले