आमदार नीतेश राणेंच्या संकल्पनेतून उपक्रम
वार्ताहर / वैभववाडी:
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व कोणताही उद्योग- व्यवसाय नसणाऱया गरीब गरजू मजुरांसाठी तसेच परराज्यातील कामगारांसाठी आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडीत बुधवारी कमळ थाळीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून गरीबांना एक वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाचे नियोजन वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी भाजप वैभववाडी शहर प्रभारी सुदन बांदिवडेकर, तालुकाध्यक्ष नासीर काझी, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, रवींद्र रावराणे, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, संजय सावंत, स्नेहलता चोरगे, बाळा हर्याण, हर्षदा हर्याण, संतोष पवार आदी उपस्थित होते. भाजप पक्ष कार्यालय परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. शंभर गरजू व परप्रांतीय मजुरांनी कमळ थाळीचा लाभ घेतला. मजुरांची संख्या वाढली, तर कमळ थाळीची संख्या वाढविणार असल्याचे तालुका प्रभारी बांदिवडेकर यांनी सांगितले.