बेळगाव : मंगळूर येथील अल्वाज येथे झालेल्या ज्युनियर राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत वैभव पाटीलने 5000 मी. व 10,000 मी. धावण्याच्या स्पर्धेत यश मिळविल्याने आसाम येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची कर्नाटक संघात निवड झाली आहे.
अल्वाज येथे झालेल्या स्पर्धेत 5 हजार मीटर धावण्याची व 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. या कामगिरीमुळे याच महिन्यात आसाम, गुवाहाटी येथील सुरजभाई ऍथलेटिक्स स्टेडियमवर होणाऱया 36 व्या राष्ट्रीय ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेत वैभव पाटीलची कर्नाटक ऍथलेटिक्स संघात निवड झाली आहे. 20 वर्षाखालील मुला-मुलींसाठी ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. वैभव हा खानापूर तालुक्मयातील बिद्दरभावी गावचा सुपुत्र असून, बेंगळूर येथील कंठिरेवा स्टेडियमवर सराव करत आहे. त्याला क्रीडा शिक्षक एल. जी. कोलेकर व बेंगळूरचे एनआयएस प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.