तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
वैराग– मोहोळ एसटी बंधारच्या पाणीच्या भरलेल्या पुलाजवळ झाली पलटी. केवळ विठ्ठलाच्या आशीर्वादामुळे आम्ही वाचलो. ‘वेळ आली होती पण काळ आला नव्हता, असे उदगार महिला वाहक भालशंकर यांच्या तोंडून निघाले.
समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये बस आदळून मलीक पेठ बंधारेच्या व सीना नदीच्या पुलावर असलेल्या कठड्याला धडकुन झालेल्या अपघातामध्ये ६३ प्रवासी बालबाल बचावले. मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी एसटी बस एमएच ०७ सी ७३३३ वैराग– मोहोळ ही वैराग येथून साडेबाराच्या दरम्यान चालक ईस्माईल मुलाणी व महिला वाहक भालशंकर हे दोघे घेऊन निघाले. होते. दोन वाजलेच्या दरम्यान हा अपघात घडला. पंरतू बसचालकाच्या प्रसंगावधामुळे एस. टी. सर्व प्रवासी बचावले. माघवारी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व प्रवाशांची संख्या ६३ होती. यातील १४ प्रवासी जखमी झाले असुन तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. महिला वाहक भालशंकर यांच्या हातास जखम होऊन तो फॅक्चर झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असल्याचे बसस्थानकप्रमुख यांनी सांगितले. केवळ एसटी चालकांच्या प्रसंगावधानामुळे एसटीमधील सर्वच प्रवासी सुखरुप बचावले .