प्रतिनिधी /पणजी
वॉटरकलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा तर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून फर्मागुडी येथे वॉटरकलर आर्टिस्टसाठी पेंटिंग स्पर्धा रविवारी दि. 20/02/2022 रोजी आयोजित करण्यात आली.
वॉटरकलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा हा एक वॉटर कलर माध्यमातून काम करणाऱया चित्रकारांचा गट आहे ,जो दर रविवारी गोव्यातील विविध ठिकाणी जाऊन
प्रत्यक्षपणे जल रंगाचा वापर करून चित्रे साकारतात. या ग्रुप मध्ये जल रंगाचा वापर करून चित्रं काढणारे व्यावसायिक चित्रकार ,तसेच हौशी चित्रकारही सदस्य आहेत. आतापर्यंत या चित्रकारांनी पणजी ,फोंडा, मडगाव येथील विविध ठिकाणी जाऊन चित्रे साकारलेली आहेत.
रविवारी फर्मागुडी येथे या चित्रकारांसाठी शिवाजीच्या पुतळय़ाचे प्रत्यक्ष पणे चित्र रंगवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली.स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. या स्पर्धेसाठी एकूण 27 चित्रकारांनी भाग घेतला.
वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन मध्ये दहा चित्रकारांची एक एक्झक्मियूटिव्ह कमिटी आहे , या कमिटीमध्ये कालिदास सातार्डेकर, गोविंद सिलीमखान , गिरीश गुजर, प्रसाद नाईक, विनय म्हांबरे ,संदेश नाईक ,सौमित्र बखले ,सुजय नाईक, रेणुका कळंगुटकर ,अंकिता माईनकर, हे सर्वजण या ग्रुपला मार्गदर्शन करतात.
निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक चिराग कामत, द्वितीय क्रमांक आकाश गावडे प्रियोळकर, तृतीय क्रमांक अनिता कुबल, उत्तेजनार्थ ऋषी सातार्डेकर, नवज्योत नाईक. स्पर्धेचे परीक्षण अचिंत्य हजरा (वेस्ट बंगाल), अतुल गेंडले (महाराष्ट्र).