नवी दिल्ली
ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी वॉलमार्टचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय 1.3 टक्के इतका वाढला आहे. 31 ऑक्टोबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा व्यवसाय 2.2 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या यशात फ्लिपकार्ट व फोन पे यांचा वाटा अधिक असल्याचे सांगितले जाते. वॉलमार्टची विक्री ऑक्टोबर तिमाहीअखेर 2.2 लाख कोटी रुपयांवर होती. फ्लिपकार्ट व फोन पे यांच्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. वॉलमार्टच्या विक्रीत तिमाहीमध्ये 5 टक्के इतकी वाढ झाल्याचे समजते. कोरोनाच्या कालावधीत अनेकांनी प्रत्यक्ष खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीवर जोर दिला होता.