नवी दिल्ली
चेन्नईत मुख्यालय असणाऱया झोहो कॉर्पने बेंगळूरमधील स्टार्टअप कंपनी वोक्सलग्रीड्समध्ये 35 कोटींची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. या अंतर्गत 25 टक्के इतका वाटा झोहो कॉर्पकडे राहणार आहे.
वैद्यकीय उपकरणे जसे की एमआरआय स्कॅनर्स बनवणारी कंपनी म्हणून वोक्सलग्रीड्सचा उल्लेख होतो. 2017 मध्ये ही कंपनी सुरू झाली असून हलक्मया वजनाचे, कुठेही नेता येणारे व सहज वापरता येणारे एमआरआय स्कॅनर्स कंपनी बनवते. ग्रामीण भागात एमआरआय स्कॅनर्स वापरता येतील, अशी कंपनीने बनवली आहेत. 22 जणांच्या या कंपनीने 20 कोटींचे अनुदान प्राप्त केले आहे. बेंगळुरात कंपनी दरवर्षाला 25 मशीन्सची निर्मिती करते.