बेळगाव/प्रतिनिधी
सर्वोत्कृष्ट शासकीय सेवेबद्दल येथील कामगार खात्याचे उपसंचालक व्यंकटेश शिंदीहट्टी यांना राज्य सरकारने 2022 सालचा सर्वोत्कृष्ट सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील एकूण 30 सरकारी अधिकाऱयांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रत्येक जिह्यातील एकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. यंदा बेळगाव जिह्यातून बेळगावातील कामगार खात्याचे उपसंचालक व्यंकटेश शिंदीहट्टी यांची निवड झाली आहे. राज्य शासनातर्फे दरवषी उत्कृष्ट सेवा बजावणाऱया अधिकाऱयांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. बेळगाव जिह्यातून शिंदीहट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
व्यंकटेश शिंदीहट्टी हे मूळचे मुडलगी येथील असून शालेय शिक्षण मुडलगी येथेच झाले आहे. त्यांनी बी.व्ही.बी. हुबळी येथून बी. ई. तर गोगटे अभियांत्रिकी महाविद्यालय बेळगाव येथून एम. टेक. शिक्षण पूर्ण केले आहे. अभ्यासूवृत्तीचे असलेले शिंदीहट्टी यांनी म्हैसूर येथून कायदा शाखेतील एलएल.एम. शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते राणी चन्नम्मा विद्यापीठातून पीएच. डी. करीत आहेत. 1999 बॅचचे केएएस अधिकारी असलेले व्यंकटेश शिंदीहट्टी यांनी कामगार खात्याचे साहाय्यक संचालक म्हणून मंगळूर येथे 5 वर्षे, म्हैसूर येथे 3 वर्षे त्यानंतर बेंगळूर, हासन येथे सेवा बजावली आहे. सध्या ते मजगाव बेळगाव येथील कामगार खात्याच्या कार्यालयात उपसंचालक म्हणून 3 वर्षांपासून सेवा बजावत आहेत.
कामगार खात्याचे उपसंचालक म्हणून उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना 50 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.