राजूचा खून दोन सहकारी अन् पत्नीकडून : सराईत गुन्हेगारांना दहा लाखांची सुपारी : प्रत्यक्ष खुनी अद्याप फरारी
प्रतिनिधी /बेळगाव
रिअल इस्टेट व्यावसायिक राजू मल्लाप्पा दोड्डबोम्मण्णावर (वय 41) या युवकाच्या खुनाचा उलगडा झाला आहे. खुनाच्या घटनेनंतर केवळ आठ दिवसांत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या खळबळजनक खून प्रकरणाचा छडा लावला असून सोमवारी राजूच्या पत्नीसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. दहा लाखाची सुपारी देऊन त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
मंगळवार दि. 15 मार्च रोजी सकाळी मंडोळी रोड, भवानीनगर परिसरात कार अडवून राजूचा खून करण्यात आला होता. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे.
खून झालेल्या राजूची पत्नी किरण दोड्डबोम्मण्णावर (वय 26) रा. टिळकवाडी, त्याचा मित्र धरणेंद्र घंटी (वय 52) मूळचा राहणार हलगा-बस्तवाड, सध्या राहणार ओमनगर-खासबाग, शशिकांत शंकरगौडा (वय 49) मूळचा राहणार अलारवाड, सध्या रा. हिंदवाडी या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. धरणेंद्र व शशिकांत हे दोघे राजूचे व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांना पत्नी किरणनेही साथ दिल्यामुळे खुनाचा कट रचण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
दहा लाखांची सुपारी देऊन राजूचा खून केला आहे. पोलीस तपासात ही खळबळजनक माहिती उघडकीस आली असून सुपारी घेणारा व प्रत्यक्ष खून करणाऱया गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना रात्री येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. फरारी आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱयांनी बोलून दाखविला आहे.
उपलब्ध माहितीनुसार राजू हा मूळचा हलगा-बस्तवाडचा. दहा वर्षांपूर्वी धरणेंद्र व शशिकांत या मित्रांना सोबत घेऊन रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला. एक प्रकल्पही सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पातील नफ्या-तोटय़ावरून तिन्ही मित्रांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. याबरोबरच राजू खासबाग परिसरात एक नवी इमारत बांधतो आहे. या इमारतीत शशिकांतनेही एक गाळा बुक केला आहे. तर धरणेंद्रनेही पत्नीच्या नावे कर्ज काढून यासाठी राजूला पैसे दिले होते. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेले वितुष्ट खुनापर्यंत पोहोचले.
आठ दिवसांच्या आत खुनाचा तपास पूर्ण
राजूच्या खुनाला मंगळवारी आठ दिवस पूर्ण होतात. आठ दिवसांच्या आत खुनाचा तपास पूर्ण करून गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळणाऱया पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे. या प्रकरणात काही गुन्हेगारांना बाजूला काढण्यासाठी धडपड करण्यात आली. हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या लक्षात येताच जे खुनाच्या गुन्हय़ात सहभागी आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही, ज्यांचा सहभाग नाही त्यांना त्रास द्यायचा नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.