मनपा आयुक्तांची सूचना : महापालिका व्याप्तीत 20 हजार मालमत्ता व्यावसायिक
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका व्याप्तीमध्ये वीस हजार मालमत्ता व्यावसायिक आहेत. मात्र केवळ नऊ हजार व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवाना घेतला आहे. उर्वरित व्यावसायिकांनी परवाने का घेतले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून व्यवसाय परवान्यांची तपासणी करा, असा आदेश महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना बजावला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांकडे व्यवसाय परवान्याची विचारणा होण्याची शक्मयता आहे.
महापालिका आयुक्तांनी विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे आयोजन केले होते. महसूल, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक आयोजित केली होती. आरोग्य विभागाच्या बैठकीवेळी व्यवसाय परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी व्यवसाय परवान्यांची माहिती घेतली असता 9 हजार व्यावसायिकांनी परवाने घेतले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली. पण महापालिका व्याप्तीमध्ये असंख्य व्यावसायिक आस्थापने आहेत. दीड लाखांहून अधिक मालमत्ता असून यापैकी 20 हजार मालमत्ता व्यावसायिक म्हणून महापालिकेला करभरणा करतात. यामध्ये व्यापारी संकुल, व्यापारी गाळे, मॉल, शोरुम अशा विविध व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. मात्र केवळ 9 हजार व्यावसायिकांनी परवाने घेतले आहेत का, असा मुद्दा महापालिका आयुक्तांनी उपस्थित केला. मालमत्ता आणि शहरातील व्यावसायिकांची संख्या पाहता व्यवसाय परवाने घेतले नसल्याची बाब निदर्शनास येत आहे.
त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाकडे परवाना आहे का, याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यापूर्वी व्यवसाय परवाना तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने ही मोहीम थांबविण्यात आली होती. मात्र महापालिका आयुक्तांनी आता व्यवसाय परवान्यांची तपासणी करण्याची सूचना केली असल्याने शहरातील व्यावसायिकांकडे परवाने आहेत का? याची चाचपणी केली जाण्याची शक्मयता आहे.
प्रत्येक व्यावसायिकांना परवानगी घेण्याची सूचना
व्यवसाय परवान्याच्या माध्यमातून महापालिकेला महसूल उपलब्ध होतो. पण व्यवसाय परवाना घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपाला महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळेच व्यवसाय परवान्याची तपासणी करण्यासह प्रत्येक व्यावसायिकांना परवानगी घेण्याची सूचना करण्याचा आदेश आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना बजाविला आहे.