साहित्यः 1 वाटी कोबी खिसून, अर्धी वाटी शिमला मिरची खिसून, अर्धी वाटी गाजर खिसून, 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोर, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा सोयासॉस, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, 2 चमचे आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
कृतीः बाऊलमध्ये खिसलेली कोबी, शिमला मिरची आणि गाजर घेऊन त्यात तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोर, सोयासॉस, मीठ, काळीमिरी पावडर आणि आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात दोन चमचे पाणी घालून मळून घ्यावे. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत. आता गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. तेल चांगले गरम झाले की आच मंद करून त्यात तयार गोळे सोडून हलक्या सोनेरी रंगावर आणि क्रिस्पी होइपर्यंत तळून पेपरनॅपकीनवर काढावेत. आता तयार व्हेज फ्रिट्टर्स सॉस अथवा ग्रीन चटणीसोबत खाण्यास द्या.