अँड्रॉइड-आयओएस युजर्सची प्रतीक्षा संपुष्टात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्हॉट्सअपने शेवटी आपल्या वापरकर्त्यांसाठी डार्क मोड ही एक वैशिष्टय़ सुविधा सादर केली आहे, याची वर्षानुवर्षे वाट पाहिली जात होती. व्हॉट्सऍपने अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी ही सुविधा आणली आहे. असंख्य वापरकर्ते बऱयाच दिवसांपासून या सुविधेची मागणी करत होते. या वापरकर्त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे, असे व्हॉट्सऍपने आपल्या ब्लॉग पेजद्वारे सांगितले आहे.
ही नवीन सुविधा अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहे की, जर फोन कमी प्रकाशाच्या ठिकाणी वापरला तर वापरकर्त्यांच्या डोळय़ांवर ताण येणार नाही. ऍपच्या प्रत्येक स्क्रीनवर वापरकर्त्यांनी लक्ष द्यावे म्हणून ऍपमध्ये रंग आणि काही भिन्न डिझाईन वापरल्या असून, जेणेकरून आवश्यक माहिती दिसेल, असे व्हॉट्सऍपने म्हटले आहे.