वृत्तसंस्था / मुंबई :
मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱया दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना आता थोडासा दिलासा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार 733 कोटी रुपयांच्या कर परताव्याला मान्यता दिली आहे. न्यायालयाने चार आठवडय़ांच्या कालावधीत ही रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाकडे व्होडाफोन आयडियाने जवळपास 4,700 कोटी रुपयांचा कर परतावा मिळण्याची मागणी केली होती. यावर न्यायमूर्ती यू,यू. ललित यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱया खंडपीठाने यावेळी फक्त 733 कोटी रुपये परत करण्यास मान्यता दिली आहे आणि या प्रकरणाला पूर्ण विराम दिल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आपला निर्णय देताना म्हटले आहे, की आमच्या निर्देशानुसार 733 कोटी रुपयांची रक्कम येत्या चार आठवडय़ाच्या कालावधीत अपीलकर्त्याला परत करण्यात यावी. हा निर्णय 2016-17 आणि 2017-18 या कालावधीतील अधिनियामुसार कलम 143च्या उपकलम 2 च्यानुसार ही कार्यवाही समाप्त करत असल्याचे म्हटले आहे.
कंपन्यांचे समभाग तेजीत
व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांचे समभाग मागील काही दिवसांपासून घसरणीचा प्रवास करत होते. सर्वोच्च परंतु न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयामुळे समभाग जवळपास 5 टक्क्मयांनी वधारले असल्याचे पहावयास मिळाले आहे.