बेळगाव : मराठा कॉलनी येथील रहिवासी व मार्केट यार्ड येथील प्रतिष्ठित व्यापारी, मराठा मंडळ या शैक्षणिक संस्थेचे संचालक, अनेक संस्थांचे आश्रयदाते, दानशूर व्यक्ती शंकरराव गंगाराम पाटील (वय 87) यांचे शुक्रवारी वार्धक्मयाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे. सदाशिवनगर स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मान्यवरांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
उद्या शोकसभा
शंकरराव यांचा अनेक संस्थांशी निकटचा संबंध होता. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि. 3 रोजी सायंकाळी साडेचार वाजता मराठा मंदिर, गोवावेस येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे.