प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यातील 226 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर गेल्या 24 तासांत 6 नवे रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या 74 वर पोहोचली आहे. अद्याप 2 हजार 264 जणांचा अहवाल यायचा आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 798 वर इतकी झाली असून यापैकी 26 हजार 378 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्याप 36 हजारांहून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. गरज भासल्यास त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे.
शनिवारी चन्नम्मानगर, बैलहोंगल, पट्टीहाळ के.बी. परिसरातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत जिह्यातील 5 लाख 6 हजार 921 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 75 हजार 46 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.