नवी दिल्ली : ‘टीन बॅटिंग सेन्सेशन’ शफाली वर्मा हिला बुधवारी बीसीसीआय वार्षिक करारात बी ग्रेडमध्ये बढती मिळाली. बीसीसीआयने वार्षिक करार श्रेणीतील खेळाडूंच्या संख्येत मात्र कपात केली असून 22 ऐवजी आता 19 खेळाडूंनाच करारबद्ध केले आहे.
बीसीसीआयने या 19 खेळाडूंकरिता 3 ग्रेड केले असून ए ग्रेडमधील खेळाडूंना 50 लाख रुपये, बी ग्रेडमधील खेळाडूंना 30 लाख रुपये व सी ग्रेडमधील खेळाडूंना 10 लाख रुपये वार्षिक मानधन दिले जाणार असल्याची घोषणा यावेळी केली. यात पहिल्या ग्रेडमध्ये टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, व लेगब्रेक गोलंदाज पूनम यादव या तीनच खेळाडूंचा समावेश आहे.
बी ग्रेडमध्ये झुलन गोस्वामी, मिताली राज, दीप्ती शर्मा यांच्यासह एकूण 10 खेळाडू समाविष्ट आहेत. सी ग्रेडमध्ये 6 खेळाडू असून यात युवा खेळाडू रिचा घोषचा प्राधान्याने समावेश आहे. मागील वर्षीच्या मध्यवर्ती करारात या सी ग्रेडमध्ये आतापेक्षा 5 खेळाडू अधिक होते. ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीकरिता आताचा करार लागू असणार आहे. 19 करारप्राप्त खेळाडूंमध्ये फलंदाज वेदा कृष्णमूर्ती व डावखुरी फिरकीपटू एकता बिश्त यांचा समावेश नाही, ही लक्षवेधी बाब आहे.
महिला खेळाडू व त्यांचे करार
ग्रेड ए (50 लाख रुपये) : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम यादव.
ग्रेड बी (30 लाख रुपये) : मिताली राज, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्यूज.
ग्रेड सी (10 लाख रुपये) : मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, हरलीन देओल, प्रिया पुनिया, रिचा घोष.
व ऑस्ट्रेलियन महिला संघच नियमितपणे कसोटी क्रिकेट खेळत आले असून यातही विशेषतः महिला ऍशेसमध्ये त्यांच्या अधिक लढती होतात.