ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. पवार यांची 24 जानेवारी रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 8 दिवस त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेतले. आज त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली.
पवार यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी आरटी-पीसीआर चाचणी नाकारात्मक आली आहे. मी माझ्या सर्व डॉक्टरांचे, मित्रांचे, सहकाऱ्यांचे, शुभचिंतकांचे आणि मला लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थना करणाऱ्या, शुभेच्छा पाठवणाऱ्या सर्वांचे आभार मानतो.