सोमवारी पुन्हा जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर परिसरात सोमवारी जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह वळिवाने झोडपले. या झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. काहीवेळ पाऊस पडला तरी जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या होत्या. ग्रामीण भागात या पावसामुळे विद्युत पुरवठाही वरचेवर खंडित होत होता. बेळगावसह शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, खासबाग, टिळकवाडी व ग्रामीण भागात पावसाने दुपारीच हजेरी लावली. सोमवारी सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. या उष्म्यामुळे साऱयांच्याच अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.
दुपारी 4 च्या सुमारास जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाल्याने शहरासह ग्रामीण भागाकडे जाणाऱया नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाला जोर नसला तरी वारा मात्र अधिक होता. त्यामुळे पावसात सापडलेल्यांच्या मनामध्ये चांगलीच धडकी भरली होती.
ग्रामीण भाग आणि उपनगरांमध्ये वाऱयाला अधिक जोर होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या होत्या. दुपारी आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी यांची चांगलीच तारांबळ उडाली तर ग्रामीण भागामध्ये शेताकडे गेलेल्या शेतकऱयांचीही तारांबळ उडाली होती. या पावसामुळे जोंधळा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वळिवाचे आगमन होत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. याचबरोबर मोठे नुकसानही झाले आहे. पावसापेक्षा वाऱयाचा जोर अधिक होता. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.
आठ दिवसांपूर्वीच झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली होती. विद्युत खांबही कोसळले होते. त्यानंतर पुन्हा सोमवारीही असाच जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक रस्त्यांवर काहीवेळ पाणी साचून होते. दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या बाजुला वाहने पार्किंग करून आडोसा शोधला होता. त्यानंतर बऱयाच उशिराने पाऊस कमी झाल्यानंतर वाहनचालकांनी घर गाठले.