प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या मागील काही दिवसांपासून उष्माने हैराण झालेल्या शहराला शुक्रवारी वादळी वाऱयाचा जोरदार तडाखा बसला. या पावसाने काही ठिकाणी पडझड झाली. तर काही ठिकाणी वीजतारा तुटणे, झाडे कोसळून पडण्याचे प्रकार घडले. काही वेळ पावसाने शहराला झोडपले. शहराचा विद्युतपुरवठा काही काळ खंडित झाला होता.
मागील काही दिवसांपासून अधून-मधून ढगाळ वातावरण निर्माण होत होते. शुक्रवारी दुपारी अचानक गारांसह वादळी पावसाला सुरूवात झाली. शहर परिसरात अर्धा तासाहून अधिक काळ झालेला हा पाऊस काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात झाला. वादळी पावसाने नागरिकांना रस्त्यांवरून ये-जा करणेही कठीण झाले होते. त्यामुळे थोडय़ा वेळासाठी रस्तेही निर्मनुष्य झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढला असून शहराचा पारा देखील 36 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने गारवा मिळाला. शुक्रवारी दुपारी उन्हानंतर आभाळ दाटून वादळी वाऱयासह पावसाचे आगमन झाले. शहर परिसरात काही ठिकाणी हलक्मया सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
पाऊस कमी पण वादळी वारा जास्त झाल्याने काही ठिकाणी पडझड झाली. काही ठिकाणी झाडे रस्त्यावरच पडल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
दुपारी झालेल्या वादळी पावसाने बेळगाव-हिंडलगा मार्गावरील मिलिटरी फर्मजवळ भर रस्त्यावर झाड कोळसल्याने काही काळ या मार्गावरील वाहतून ठप्प झाली होती. झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. शिवाय वडगाव कलमेश्वरनगर येथील परिसरात वीज खाब्यांवरील तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.