प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर येथील अळवण गल्ली-जेड गल्ली परिसरात अंदर-बाहर जुगार खेळणाऱया 10 जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. एक जण फरारी झाला आहे. शुक्रवारी रात्री शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून सर्व 11 जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अळवण गल्ली-जेड गल्ली बोळ परिसरात अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकला. कोरोना महामारी थोपविण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरीही लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून जुगार खेळण्यात येत होता.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक मंजुनाथ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, ए. एस. कोरीशेट्टी, एस. ए. सोमापूर, एन. सी. तुरमंदी, एम. बी. यम्मी, एच. वाय. विभुती, एम. एस. वडेयर, ए. एन. तारिहाळ, व्ही. डी. कोलकार आदींनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या 10 जणांकडून 3 हजार 140 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
इम्रान मुस्ताक बेपारी (रा. अळवण गल्ली-शहापूर), अमरनाथ शिवराम मिरजकर (रा. दाणे गल्ली-शहापूर), कौस्तुक तवनाप्पा पाटील (रा. भोज गल्ली-शहापूर), सादीक निसार मंटूर (रा. जेड गल्ली-शहापूर), तन्वीर महम्मदगौस पंचम (रा. खासबाग), खतालअहम्मद बेपारी (रा. मीरापूर गल्ली-शहापूर), रिजवानखान पयुमखान पठाण (रा. अळवण गल्ली-शहापूर), जाहीद अल्ताफ शेख (रा. महात्मा फुले रोड), मोहीद इरफान बेपारी (रा. जेड गल्ली-शहापूर), तौफीत निसार बेपारी (रा. जेड गल्ली-शहापूर) अशी अटक करण्यात आलेल्या 10 जणांची नावे आहेत. सत्यम सुहास हुद्दार (रा. अळवण गल्ली-शहापूर) हा फरार झाला आहे.