ऑनलाईन टीम / इंदौर :
प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे मी काल कोरोनाची टेस्ट करुन घेतली. त्या टेस्ट चे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मी ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो आहे. प्रार्थना करा की, मी लवकरात लवकर या आजाराला हरवेन.
पुढे ते म्हणाले, मी माझ्या तब्येतीची माहिती ट्वीटर आणि फेसबुक वरून आपल्याला देत राहीन. एक विनंती आहे मला किंवा माझ्या कुटुंबियांना फोन करू नका, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले आहे.
राहत यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मध्यप्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी देखील त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.