मराठा युवक संघ आयोजित एल. आर. पाटील स्मृती जिल्हास्तरीय स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मराठा युवक संघ आयोजित बेळगाव रोलर स्केटींग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एल. आर. पाटील स्मृती जिल्हास्तरीय आंतरशालेय-महाविद्यालयीन स्केटींग स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
मराठा कॉलनीसमोरील मार्गावर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दै. तरुण भारतचे सल्लागार समुह प्रमुख किरण ठाकुर, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, मारूती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी, दिनकर घोरपडे, शिवाजीराव हंगीरगेकर, सुहास किल्लेकर, गणेश दड्डीकर, नारायण किटवाडकर, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव, शेखर हंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 150 हून अधिक स्केटींगपटूंनी भाग घेतला होता.
मान्यवरांच्या हस्ते ध्वज उंचावून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे किरण ठाकुर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देवून सध्याच्या जीवनात खेळ खेळणे आवश्यक असून, त्यामुळे आपले शरीर सदृढ व बळकट बनते. या तांत्रिक युगात खेळाडूंना मोबाईलपासून व इतर व्यसनापासून दूर करण्यासाठी अशा स्पर्धा भरविण्याची गरज आहे. मराठा युवक संघाने जलतरण, शरीरसौ÷व व विविध खेळांचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम हे कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धा पुढील काळात भरवाव्यात, असे ते म्हणाले.