प्रतिनिधी / बेळगाव
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शास्त्रीनगर भागात गुजरात भवन येथे गौरी चाफ्याची रोपटी लावण्यात आली. शहरात विकासकामे राबविताना असंख्य झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वृक्षाची गरज असल्याने पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर रोपांची लागवड करून त्या रोपांचे रक्षण करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुजरात भवनचे जे÷ संचालक भुपेंद्र पटेल, विजय बद्रा, भाविन पटेल, गौरांग राणा, भावेश चुडासमा, दक्षेस राणा, अमित राच्छ, नितीन बद्रा, युवराज राऊळ, निकुंज पटेल व राहुल पाटील हे उपस्थित होते. हा कार्यक्रम नवरात्र उत्सव मंडळ गुजरात भवनचे अध्यक्ष रमेश लद्दड यांच्या मार्गदर्शनानुसार झाला.