तरुणभारत ऑनलाइन टीम
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पठाण’ आणि डंकी या आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आता शाहरुखने त्याच्या आणखी आगामी चित्रपट ‘जवान’ची घोषणा केली होती.या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.शाहरुखने जवानचा टीझर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या टीझरमध्ये शाहरुखचा चित्रपटातला फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
या टीझरमध्ये शाहरुखने चेहऱ्यावर पट्टी बांधली आहे तसेच त्याच्या हातात बंदूक देखील आहे. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडा भाषेत प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान सगळ्यात शेवटी ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता.आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे.