प्रतिनिधी / शाहुवाडी
कोल्हापूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी येथील पेट्रोल पंपासमोर रस्त्या कडेला थांबलेल्या ट्रकवर मोटार सायकल आदळून झालेल्या अपघातात शाहूवाडी येथील व्यापारी अतुल शंकर बोबाटे वय ४८ हे गंभीर जखमी झाले. कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
शनिवारी रात्री ही घटना घडली होती. शाहूवाडी पोलीसात या घटनेची नोंद झालेली नाही. त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.