वार्ताहर/ किणये
मच्छे येथील वाचनालयाच्यावतीने शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त गावात विविध प्रकारच्या जातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लागवड करण्यात आलेल्या झाडांची जोपासना करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला.
मच्छे गावातील तलाव व ब्रम्हलिंग मंदिर परिसरात सुमारे 25 हून अधिक झाडे लावण्यात आली. वाचनालयातील कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाचे गावात कौतुक करण्यात येत आहे. बजरंग धामणेकर, विनायक चौगुले, केतन चौगुले, सूरज अनगोळकर, बसवंत लाड, उल्हास पाटील, संदीप वागाजी, प्रवीण कणबरकर, नारायण अनगोळकर, पुंडलिक कणबर्गी आदींनी या उपक्रमात भाग घेतला होता.