ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन; महादेव देसाई यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / ओरोस:
प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदलीस परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई यांनी दिली.
शिक्षकांच्या बदल्याचे धोरणात बदल करण्याबाबत समिती स्थापन करून सर्व संघटना, प्रशासकीय अधिकारी, शिक्षणतज्ञ यांचे मत विचारात घेऊन बदल करण्याबाबत विचार झाला. परंतु नवीन बदली धोरणावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी कोरोनाचं संकट आलं.
शासनाचे आर्थिक स्रोत गोठल्यामुळे शासन तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी शासन खर्चात काटकसर करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 4 मेच्या शासन निर्णयाने शासकीय खर्चावर निर्बंध आणले आहेत व त्याचाच एक भाग म्हणून 2020-21 या वर्षामध्ये कर्मचारी व शिक्षक यांच्या बदल्या करू नयेत, असे निर्देश दिले आहेत.
2018-19 व 2019-20 या दोन वषी ऑनलाईन बदल्यातील त्रुटीमुळे हजारो शिक्षक विस्थापित झाले आहेत. त्यामध्ये महिलांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे यावषी फक्त जिल्हास्तरावर विनंती बदली करण्याचे अधिकार द्यावेत. विनंती बदलीमुळे बऱयाचअंशी शिक्षकांची सोय होईल व शासनस्तरावर अर्थिक खर्चाचा प्रश्न येणार नाही. कुठलाही आर्थिक भार येणार नाही.
अशी असावी बदली पद्धत
बदलीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावेत. या वषी फक्त विनंती बदल्या कराव्यात. बदली पात्रसाठी 30 जून ही दिनांक ग्राह्य धरावी. तालुक्मयातील रिक्त जागाच्या प्रमाणात विनंती बदल्या कराव्या. संवर्ग 1 मध्ये फक्त नव्याने समाविष्ट शिक्षकांना संधी द्यावी. संवर्ग दोनमध्ये विनाअट 30 कि.मी बाहेरील शिक्षकांचे एकत्रीकरण व्हावे. संवर्ग 3 व 4 मधील पात्र शिक्षकांना विनंती बदलीची संधी द्यावी. 2019-20 मधील विस्थापित शिक्षकांना विनाअट बदलीची संधी द्यावी. आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे
वरील बाबींचा विचार करून शिक्षकांना विनंती बदलीची संधी द्यावी. या धोरणामुळे शिक्षकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय शासन बदली भत्ता दिला जाणार नसल्याने शासन तिजोरी व आर्थिक राहणार नाही. म्हणून राज्यातील शिक्षकांची अडचण लक्षात घेता बदल्यासंबंधी शासनस्तरावर त्वरित कार्यवाही होऊन लॉकडाऊन संपताच याबाबत शासन निर्णय निर्गमित व्हावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.