शिये/प्रतिनिधी
शिये (ता.करवीर) येथील डोंगर पायथ्याला रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नऊ ते दहा गव्याचा कळपाचे नागरिकांना दर्शन झाले.
सदर गव्यांचा कळप पहाटेच्या सुमारास भुयेतील शेतवडीतुन शिवची जांभळकडील रत्याने शियेतील शेतवडीतुन नागारखण येथे गेले. त्या ठिकाणी पाणी पित असलेल्या गव्यांचा कळप काही शेतकऱ्यांना दिलासा. तो कळप म्हादीरा, चौक या शेतपरिसरातून कासारवाडीच्या खिंडीतून कासारवाडीकडे गेल्याचेही काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. तर दोन- तीन गवे भुयेतील संजय पाटील यांच्या शेतातून नदीकडे गेले असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान करवीरचे वनपाल रमेश कांबळे, विजय पाटील, वनरक्षक एस. एस. हजारे, कृष्णात दळवी हे गटा-गटाने शिये, भुयेवाडी, कुशिरे-पोहाळे, सादळे-मादळे परिसरात लोकांना सुचना देत काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.