शिरोळ/प्रतिनिधी
येथील पंचायत समितीच्या उपसभापती पदी स्वाभिमणी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती मल्लू खोत यांनी आघाडी अंतर्गत ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी पंचायत समितीच्या सभागृहात खास सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ या होत्या.
काँग्रेस जेष्ठ नेते गणपतराव पाटील, आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांनी महाविकास आघाडी स्थापन करून या नेत्यांनी प्रत्येक सदस्याला सभापती व उपसभापती पदाची संधी देण्याच्या निर्णय घेतला आहे. आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे विद्यमान उपसभापती मल्लू खोत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
शुक्रवार दि . 28 रोजी दुपारी 12 वाजता उपसभापती पदासाठी सचिन शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी दोन वाजता तहसीलदार अपर्णा मोरे यांनी उपसभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने सचिन शिंदे यांची उपसभापती पदी निवडीची घोषणा केली निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सभापती कविता चौगुले, माजी सभापती मल्लप्पा चौगुले संजय माने , सुरेश कांबळे, मिनाज जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन उपसभापती सचिन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन उपसभापती सचिन शिंदे यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण सर्वांनी संधी दिली या संधीचा सोने करू आपण जो विश्वास माज्यावर दाखविला आहे त्या विश्वास कदापि ही तडा जाऊ देणार नाही आपण सर्वाना विश्वासात घेऊन काम करू अशी ग्वाही दिली.