प्रतिनिधी / शिरोळ
नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त नांद्रेकर कुटुंबिय शिरटी ता. शिरोळ येथे गेले होते. मात्र घरगुती कामामुळे भारत नांद्रेकर हे रात्री मोटारसायकलवरुन कवठेसारला निघाले होते. शिरोळमधील कन्या शाळेसमोरुन पुढे आल्यानंतर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला.
गंभीर जखमी झाल्याने भारत नांद्रेकर यांना तातडीने सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे सदर अपघाताची नोंद शिरोळ पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही.गेल्या तीन दिवसात सततच्या अपघाताने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.